Vasaikar Music Band Part 5 | Vasaikar Music Band | वसईकर म्युझिक बॅण्ड ५

 


Vasaikar Music Band Part 5 | Vasaikar Music Band | वसईकर म्युझिक बॅण्ड ५

#Vasaikar_Music_Band_Part_5
#Vasaikar_Music_Band
#वसईकर_म्युझिक_बॅण्ड_५

Music Director :- Melwyn Dabre
Music Programming Mixing & Mastering :- Reagan Almeida
Music Sponsored  :- Leslie Miranda
Rhythm Arrangment & Played By :- Seon Almeida
Song Arranger & Saxophone :- Nester Dabre
Vasaikar Music Band Part 5 Release  Date. 01-12-2020

तु गो रूपाची खाणं
दिते कवडी छान
तुया मनंगारी फिरते बघ ना
नका खाऊ अवडा भाव
तुअ मा एकस गाव
तुई माई अयी जोडी जमवून या

अगो तुस मा रूप
न तुस मा सुख
तुया शिवाय नय कोण जीवनात
हारका तुआस इसार
होडुन दिल मी घरदार
तुया प्रेमात पागल झालो सुशिला

प्रेमात आपल्या नय काईस बंधने
आथ नाका नुसतेस कजे
समजून घे माई राणी तू गो
तुया करता मिन
कटन कटन भेट आणले (२)

रानी कर माना तू माफ
नाका मनी धरू राग
माना होडून नाका जाऊ अयी लांब
तू गो माई सुशिला
बरा नय यो तो राग
तुया करता मी काय करू हांग (२)

माया स्वप्नातील तू गो अप्सरा
आयकुन घे न मा जरा
येऊन बघ जरा वेंगेत माया
काय गालावर हळूहळू
फुल फुलतात (२)

आज पंचवीस डिसेंबर आहे
नाताळचा दिस
सण आपल्या सर्वांचा
सगळ्यांना मेरी क्रिस्मस बोलुन
करू सण आपण हवशेचा (२)

रात्री आपण देवळात जाऊन
मिस ऐकुन घरी आल्यावर
सणाची सुर्वात करू
बंधु भगिनींना शुभेच्छा देऊन

मग जल्लोष करू न पार्टी करू
नाचुन मज्जा करू
आपल्या नाताळ चा यो सण आपण
मज्जेत साजरा करू

मग घुमट वाजवु नाचु गाऊ
गोड गोड फराळ वाटू
मेरी क्रिस्मस बोलुन आपण एकमेकांना
नाताळच्या शुभेच्छा देऊ

मग जल्लोष करू न पार्टी करू
नाचुन मज्जा करू
आपल्या नाताळ चा यो सण आपण
मज्जेत साजरा करू

मग घुमट वाजवु नाचु गाऊ
गोड गोड फराळ वाटू
मेरी क्रिस्मस बोलुन आपण एकमेकांना
नाताळच्या शुभेच्छा देऊ

एक बांगडी ची नाय कोंबडी
आये कला दिल गे मला मोठे घरा (२)

मोठे घरशे पोकळ वाशे आये
कला दिल गे मला मोठे घरा (२)

रात्रीशे आठ वाजले आये
एकलीस गे मी सुलीपुड (२)

एक रोटी वाळीते आये
तुईस गे माना याद पडते (२)

तुझ्या बापाच मन उल्हासी (२)

न लाडकुले तु का माजी मोया बैसे (२)

तुला काय काय पैराण्या पडतील (२)

न सोन्याच्या अंगुठल्या
दुये तुला पैराण्या पडतील (२)

पयल वारन आमचे मामाला (२)

दुसर वारन आमचे मामीला (२)

मामा मामी हलत डुलत काय
वराडाला येतील (२)

पायाला नवाळे घेती आयल्यात का
सके ससरे का सके मामससरे का (२)

पायाला नवाळे घेती आयल्यात गे
सके ससरे गे सके नळडोये गे (२)

वसई चे रस्त्याला ढोफा ढोफा धुल ग
वसई चे रस्त्याला ढोफा ढोफा धुल (२)

वसईच्या पोरी कशा गुलाबाच फुल रे
वसईच्या पोरी कशा गुलाबाच फुल (२)

गिरीज चे रस्त्याला गो मिरा
गिरीज चे रस्त्याला (२)

तांब्या पितळी ची भांडी गो मिरा
तांब्या पितळी ची भांडी (२)

डुबय शहरात नोकरी केली धन्या
पैशाच काय केल धन्या
पैशाच काय केल धन्या (२)

तुझ्या साठी राणी बंगला बांधला मी
पैसा तो वापरीला मी पैसा तो वापरीला (२)

डुबय शहरात नोकरी केली धन्या
पैशाच काय केल धन्या
पैशाच काय केल धन्या (२)


Comments

Popular posts from this blog

Juli Go De Ga Mala Lagnache Vachan |Vasaikar Music Band | ज्युली गो दे ग मला लग्नाचे वचन

Paskin Chea Parlai Yo Dostin (Cover Instrumental)| Vasaikar Music Band | पास्कीन चे परलाय यो दोस्तीन

Vasaikar Kupari Music Band Part 3 | Vasaikar Music Band | वसईकर कुपारी म्युझिक बॅण्ड ३