Vasaikar Kupari Music Band Part 2 | Vasaikar Music Band | वसईकर कुपारी म्युझिक बॅण्ड २
VASAIKAR KUPARI MUSIC BAND PART 2 | Vasaikar Music Band | वसईकर कुपारी म्युझिक बॅण्ड २
Keyboards - Astle correia , Benizan
Saxophone - Swan d'britto
Guitar - Sezil Pereira
Handsonic - Jay Supekar
Side Rhythm - Samuel
Music Arrangement - Jay /Benizan
Vasaikar Kupari Music Band Part 2 Release Date. 28-12-2021
ज्युली गो जाईन मी मुंबयच्या शहरा
फुलांचा गोझेला आणीन
ज्युली गो दे ग मला लग्नाचे वचन
राजाची राणी मी बनवीन
अरे राजा रे जाशील तू मुंबयच्या शहरा
फुलांचा गोझेला आणशील
आता तु लाडी गोडी न फिरवशील
उद्या मला सोडून देशील
ठेविते विश्वास
नको करू माझा घात
नको करू माझा घात
घरदार सोडून
देते तुमच्या हाती हात
देते तुमच्या हाती हात
लग्नाचे देते वचन राजा
भरवसा ठेवून (२)
ज्युली गो जाईन मी मुंबयच्या शहरा
फुलांचा गोझेला आणीन
ज्युली गो दे ग मला लग्नाचे वचन
राजाची राणी मी बनवीन
खंडाळ्याच्या घाटात
गाडी गेली जोसात
यायणीला झाल पोर (२)
पोर होत झकास
नाव दिल प्रकाश
निघाल एकदम थोर (२)
शेती करितांव मोगरा खुडीतांव
मुंबय बाजारा जातांव
दुध ईकीतांव मावर धरीतांव
सुतारकी धंदा करतांव (२)
बाबु टांगेवाला बाबु टांगेवाला
टांग्याला लाल गोंडा
बाय बाय टांग्याला लाल गोंडा
बाबु टांगेवाला बाबु टांगेवाला
हाकल तुजा टांगा
जाऊदे बेगिन बेगिन घरा
या टांग्यामनी कोण
या टांग्यामनी कोण
ट्रिजा बाय ई नवरी
बाय बाय ट्रिजा ई नवरी
डोंगराच्या कडसनी
डोंगराच्या कडसनी
पाणी बाय झुरूमुरू वाजे
पाणी बाय झुरूमुरू वाजे
त्यास न गे पाण्यावरी
त्यास न गे पाण्यावरी
एक बाय मोरूलाॅ डेवलो
एक बाय मोरूलाॅ डेवलो
मोराजून बाय पाणी पिल
मोराजून बाय पाणी पिल
मोर बाय संतोशी झाल
मोर बाय संतोशी झाल
मोराजून बाय हुरान केला
मोराजून बाय हुरान केला
गेला बाय गुलशेडीशा बना
गेला बाय गुलशेडीशा बना
सकालचे परा सुटलाय वारा
उबी कला दारा (२)
चार चा टोला कोंबडा आरवला
उठलु मी रांदावला (२)
शेतकरी आमी शेतकरी
वसयवाले आमी शेतकरी
शेती करीतांव मोगरा खुडीतांव
मुंबय बाजारा जातांव
मावर धरीतांव दुध इकीतांव
सुतारकी धंदा करतांव
Comments
Post a Comment